नवे पुस्तक: मुसलमानी मुलखांतली मुशाफरी (लेखक : श्रीपाद रामचंद्र टिकेकर)
हे पुस्तक वाचून असा कोणाचाही गैरसमज होऊ शकतो की, हे पुस्तक केवळ राजकारणाविषयीच असावे, पण तसे नाही. इराक व इराणमधल्या समाजजीवनाकडे टिकेकर अगदी विचक्षण दृष्टीने पाहत होते. त्यामुळेच ते लिहितात की, इराणमध्ये वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवली जात असली, तरीही इराकमध्ये ब्रिटिश सत्तेचा पराभव असल्याने वाहने डाव्या बाजूने चालवावीत असा नियम आहे. इराकमध्ये खजुराशिवाय इतर कोणतेही झाड दिसत नाही. तसेच बसरा शहरात कोठेही गटारे नाहीत व अगदी मोठ्या कालव्यांतसुद्धा घाणेरडे पाणी असते. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयीविषयी टिकेकर लिहितात की, ‘अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ व अमंगळ लोक. त्यात इकडील थंडीचे निमित्त मिळाले की, सहा-सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही’. इराणमध्येही असाच प्रकार होता. तिथे तर एकाच कालव्यात एकमेकांपासून काही फूट अंतरावरच कपडे धुणे, भांडी घासणे व पाणी पिणे असे तिन्ही उद्योग बिनदिक्कतपणे चालले असायचे.पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.